मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत.
मराठी भाषा दिन साजरा करणे हे मराठी भाषेचा वारसा जपते आणि मराठी भाषिक समुदायांचे साहित्य, कला, संगीत आणि समाजातील योगदान ओळखण्याची संधी देते.
वामनराव मुरंजन ज्युनिअर कॉलेज ऑफ विज्ञान आणि वाणिज्य आयोजित मराठी भाषा गौरव दिन दिनांक 27 फेब्रुवारी 2024 डैफोडील हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उप प्राचार्या सौ.वेदांगी कुलकर्णी मॅडम, समन्वयक सौ.जेझी लिनोस मॅडम व पर्यवेक्षिका सौ.अनिता शिंदे मॅडम उपस्थित होत्या.